राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला पुरस्कार
राज्य निवडणूक आयोगाच्या www.mahasec.com या संकेतस्थळास राज्य मराठी विकास संस्था आणि सीडॅकच्या वतीने तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.
राज्य मराठी विकास संस्थेच्या मराठी संकेतस्थळांची स्पर्धा घेण्यात आली. 2013 मधील विविध संकेतस्थळांमधून आयोगाच्या या संकेतस्थळाची निवड करण्यात आली आहे.
prize-thumb